पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराकडूनही महत्त्वाची खबरदारी

सिद्धिविनायक मंदिर

मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरही कोरोना विषाणूशी  लढण्याकरता सज्ज झालं आहे. राज्यात फैलावत चाललेल्या कोरोना विषाणूमुळे खबरदारी म्हणून श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी  खबरदारी म्हणून काही निर्णय घेतले आहेत. यापुढे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सॅनिटायझर पुरवण्यात येणार आहे अशी माहिती बांदेकर यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.

कोरोनाचा कहर: अमेरिका आणि स्पेनमध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

दरदिवशी हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी येत असतात. यातले अनेक भाविक हे देशाच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येत असतात.  या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर देण्यात येईल. तसेच मंदिर परिसर, गाभाऱ्यातील जमिन आणि आजूबाजूला लावण्यात आलेले रेलिंग्स ठराविक अंतरानं  स्वच्छ करण्यात येणार आहे असंही बांदेकर यांनी सांगितलं. तसेच मंदिराचे पुजारी आणि कर्मचारीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावून वावरत आहेत. 

हिंदुजातील कोरोना रुग्ण कस्तुरबामध्ये, संपर्कातील इतर जणांची तपासणी

राज्यात सध्या कोरोनाचे १९ रुग्ण आढळले  आहेत. पुणे, मुंबई, नागपूर, अहमदनगरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.