पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'फिक्सर' वेब सीरिजच्या कलाकार, कॅमेरामनला गुंडांकडून मारहाण, ७ जणांना अटक

फिक्सर वेब सीरिज

फिक्सर या वेब सीरिजच्या शूटिंगवेळी काही जणांकडून सेटवरील लोकांना मारहाण करण्यात आली. यावेळी सेटवर  अभिनेता आणि दिग्दर्शक तिग्मांशू धुलियां आणि बॉलिवूड अभिनेत्री माही गिल हे उपस्थित होते. तिग्मांशू धुलिया यांनी स्वतः आपल्या सोशल अकाऊंटवरून याची माहिती दिली. ठाण्यातील घोडबंदर भागात फिक्सर वेब सीरिजचे शूटिंग सुरू असताना ही घटना घडली. सेटवर अभिनेता शब्बीर अहलुवालिया हे देखील यावेळी उपस्थित होते. या प्रकरणी ठाणे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात येत आहे. पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. 

Video: अर्जुन तेंडुलकरने घेतलेली ही विकेट एकदा पाहाच!

फिक्सर नावाच्या वेब सीरिजमधील कलाकार एका रुग्णालयाबाहेर उभे असल्याचे सोशल मीडियातील पोस्टमध्ये दिसते आहे. कॅमेरामन संतोष तुंडियाल याच्या डोक्याला पट्टी लावण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसते आहे. काही जण मद्यपान करून आले होते. आणि त्यांनी आमच्या टीममधील सदस्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी सेटवरील सामानाचीही तोडफोड केली, असे या कलाकारांनी सांगितले.

बापरे! आंतरराष्ट्रीय T२० सामन्यात ६ धावांत अख्खा संघ ऑल आउट

फिक्सरचे निर्माते साकेत साहनी यांनी म्हटले आहे की, तोडफोड करणारे सर्व गुंड होते. त्यांनी कॅमेराही तोडण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी कॅमेरामनने त्यांना रोखले त्यावेळी त्यांनी त्याच्या कपाळावर मारहाण केली. सेटवर असलेल्या महिलांशीही त्यांनी वाईट वर्तणूक केली. हे सगळे घडत असताना माही गिल तिथेच होती. पण ती स्वतःला वाचविण्यासाठी लगचेच आपल्या गाडीकडे पळाली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:shocking mahi gill and tigmanshu dhulia upcoming web series fixer attacked by goons in thane