पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोणाच्या मध्यस्थीची शिवसेनेला गरज नाही, संजय राऊत यांचे वक्तव्य

संजय राऊत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या निर्णयावर ठाम आहेत. हा प्रश्न भाजप आणि शिवसेना या दोघांमधील असून, तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीने यामध्ये मध्यस्थी करू नये, असे रोखठोक उत्तर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिले. संभाजी भिडे गुरुजी गुरुवारी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. त्यावेळी त्यांची उद्धव ठाकरे यांची भेट झाली नाही. त्यावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी वरील उत्तर दिले.

नितीन गडकरी मुंबईत, राजकीय हालचालींसाठी भाजपकडे खूप कमी वेळ

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री जास्त काळ या पदावर राहावा, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. पण हे जास्त काळ टिकणार नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणे हा शिवाजी महाराजांचा आणि येथील जनतेचा अपमान ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघेही दिल्लीच्या दबावापुढे कधीही झुकणार नाहीत, असे सूचक वक्तव्य करून ते म्हणाले, शनिवारपासून राज्याचा कारभार राज्यपालांच्या हातात जाणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राला खंबीर सरकार मिळावे, अशी भूमिका असणारे सर्व प्रमुख पक्ष मिळून पुढील दिशा ठरवतील, असेही संजय राऊत यांनी सूचकपणे सांगितले.

राज्यातील शेतकरी सुखी व्हावा; चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलाकडे साकडं

नितीन गडकरी हे मुंबईचे निवासी आहेत. त्यांचे मुंबईत घर आहे. त्यामुळे ते मुंबईत येत आहेत ही काही आमच्या दृष्टीने बातमी नाही. त्यांच्याकडे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचे काही पत्र असेल तर मला सांग मी ते उद्धव ठाकरे यांना कळवतो, असेही संजय राऊत म्हणाले.