पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हात जोडून विनंती करतो की मतदान करा - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी सहकुटूंब मतदान केले

महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान केले पाहिजे. मी हात जोडून सर्व मतदारांना विनंती करतो की प्रत्येकाने घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केले.

'मतदान करतात त्यांनाच सरकारकडे अपेक्षा मांडण्याचा अधिकार'

उद्धव ठाकरे यांनी वांद्रे पूर्वमधील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे हे सर्व उपस्थित होते. रांगेत उभे राहून उद्धव ठाकरे यांच्या परिवाराने मतदान केले. ठाकरे कुटुंबातील सदस्य आदित्य ठाकरे यावेळी पहिल्यांदाच वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.

'शिवसेना-भाजप युती २२० जागांच्याही पुढे जाईल असे वाटत नाही'

उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही मतदान केले आहे. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी मतदान केले पाहिजे. मी हात जोडून विनंती करतो की सर्वांनी घरातून बाहेर पडून मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले पाहिजे.