पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भावोजी अस्त्र: आदेश बांदेकर साधणार माऊलींशी संवाद

आदेश बांदेकर

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी शिवसेनेने चांगलीच कंबर कसली आहे. राज्यामध्ये युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची 'जनआशिर्वाद यात्रा' आणि 'आदित्य संवाद' हा उपक्रम सुरु आहे. याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता शिवसेनेने 'माऊली संवाद' या आणखी एका उपक्रमाची सुरुवात केली आहे. शिवसेनेचे सचिव आणि सर्वांचे लाडके भावोजी आदेश बांदेकर या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील महिलांशी संवाद साधणार आहे. 

विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात कपात

माऊली संवाद उपक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि समाजातील सर्वच घटकांतील महिलांशी संवाद साधणार आहे. राज्यमध्ये एकूण मतदारांपैकी महिला मतदारांची संख्या ही सर्वाधिक आहे. त्यामुळे महिला मतदार वर्गाला आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेनेने हा उपक्रम सुरु केला आहे. 2 ऑगस्ट म्हणजे उद्यापासून हा उपक्रम सुरु होणार असून पालघर जिल्ह्यातल्या डहाणू येथून या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. 

अलिबागच्या किनाऱ्यावरील बेकायदा बंगले आठवड्यात पाडा - हायकोर्ट

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. आतापासून सर्व पक्ष आपापल्या पध्दतीने मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांची जनआशिर्वाद यात्रा सुरु आहे. तर भाजपच्या महाजनादेश यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या यात्रेचे नेतृत्व करत आहे. तर राष्ट्रवादी देखील येत्या 6 ऑगस्टपासून राज्यात शिवस्वराज्य यात्रा काढणार आहे. या यात्रेचे नेतृत्व खासदार अमोल कोल्हे करणार आहेत. 

उन्नाव पीडितेच्या कुटुंबाची सुरक्षेसाठी अनेक पत्रे, कारवाई नाही