पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाराष्ट्राचे मालक आहोत ही अवस्था १०५ वाल्यांच्या आरोग्यास धोकादायक - शिवसेना

शिवसेना

महाराष्ट्राचे आपण मालक आहोत व देशाचे आपण बाप आहोत असे कुणाला वाटत असेल तर त्यांनी या खुळ्या मानसिकतेतून सर्वप्रथम बाहेर पडले पाहिजे. ही मानसिक अवस्था १०५ वाल्यांच्या आरोग्यास धोकादायक आहे, अशा शब्दांत पुन्हा एकदा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून भाजपवर कडाडून टीका करण्यात आली आहे. राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येणार, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्याला या अग्रलेखामधून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

महात्मा गांधींचा मृत्यू अपघाती; ओडिशामध्ये राजकारण तापले

जे पुन्हा भाजपचेच सरकार येईल असे सांगत आहेत त्या १०५ वाल्यांनी आधीच राज्यपालांना भेटून स्पष्ट केले आहे की, आमच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत, असे सांगणारे राष्ट्रपती राजवट लागू होताच आता सरकार फक्त आमचेच बरे का, असा प्रश्न कोणत्या तोंडाने विचारत आहेत. जे बहुमत त्यांच्यापाशी आधी नव्हते ते राष्ट्रपती राजवटीच्या वरवंट्याखालून कसे बाहेर पडणार, असा प्रश्न अग्रलेखात विचारण्यात आला आहे. त्याचवेळी लोकशाही आणि नैतिकतेचा खून करून आकडा लावू शकतो ही भाषा महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारी नाही, असेही म्हटले आहे.

भाजपला घेतल्याशिवाय सरकार होऊच शकत नाही - चंद्रकांत पाटील

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वी क्रिकेट आणि राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल हे सांगता येत नाही, असे म्हटले होते. त्याचा संदर्भ घेत अग्रलेखात म्हटले आहे की, हल्ली क्रिकेट हा खेळ कमी धंदाच जास्त झाला आहे. राजकारणात सट्टेबाजाराचा जोर आहे तसा तो क्रिकेटमध्येही सुरू झाल्याने फोडाफोडी आणि फिक्सिंगचा तो खेळ मैदानावर सुरू झालाय. त्यामुळे तिथेही खेळ जिंकतो की फिक्सिंग जिंकते हा संशय राहतोच. पंच फुटल्यावर पराभवाच्या टोकास गेलेल्यांच्या आशा पल्लवित होणारच. आता आमचेच सरकार हा आत्मविश्वास त्यातून जागा झाला असेलही. पण मैदानावर स्टम्प नावाची दांडकी आहेत. ती हातात घेऊन जनता तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही, असेही सूचकपणे म्हटले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:shivsena once again criticized bjp over statement by devendra fadnavis we will back in government