पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यसभेसाठी शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदींना उमेदवारी, माध्यमांचे वृत्त

प्रियांका चतुर्वेदी

गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत दाखल झालेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. काही मराठी माध्यमांनी या संदर्भातील वृत्त दिले आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी २६ मार्चला निवडणूक होणार आहे. यामध्ये सध्याच्या महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या वाट्याला एक जागा येणार आहे. त्याच जागेसाठी शिवसेनेने प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिल्याचे समजते.

व्हिसा निर्बंधांमुळे परदेशी खेळाडू १५ एप्रिलपर्यंत IPL ला मुकणार?

लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रियांका चतुर्वेदी काँग्रेसमधून शिवसेनेत आल्या होत्या. शिवसेनेने त्यांना उपनेता पद देत त्यांच्याकडे प्रवक्तापदाची जबाबदारी सोपविली. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यातील सोशल मीडियातील कलगीतुऱ्यात प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेनेची बाजू खंबीरपणे मांडली होती. 

प्रियांका चतुर्वेदी ट्विटरवर कायम सक्रिय असतात. वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयांवर त्या आपले मत ट्विटच्या माध्यमातून मांडत असतात. केंद्रातील भाजपच्या सरकावरही त्या ट्विटच्या माध्यमातून टीका करीत असतात. 

काळजी नको, कोरोनातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय

शिवसेनेकडून राज्यसभेच्या एका जागेसाठी चंद्रकांत खैरे, दिवाकर रावते यांची नावे चर्चेत होती. पण पक्षाने ऐनवेळी या दोन्ही जुन्या नेत्यांना डावलून वर्षभरापूर्वी पक्षात आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी देणे पसंद केले.