पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बैठकीला बोलावले पण गेटवर अडवले; शिवसेना आमदार संतप्त

शिवसेना आमदार

सांगली, कोल्हापूरातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलवण्यात आली होती. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी कोल्हापूरातील आमदारांना बोलवण्यात आले होते. बैठकीसाठी कोल्हापूरातील शिवसेनचे आमदार चंद्रदीप नरके, उल्हास पाटील आणि जयप्रकाश मंदुडा आले होते. मात्र त्यांना सह्याद्री अतिथी गृहामध्ये जाताना पोलिसांनी अडवले. 

कलम ३७० प्रकरण: ५ न्यायमूर्तींचे खंडपीठ करणार सुनावणी

दरम्यान, सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक सुरु होती. त्यामुळे पोलिसांनी शिवसेनेच्या आमदारांना गेटवर अडवले. शिवसेनेचे आमदार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ गेटवर तणावचे वातावरण होते. संतप्त झालेल्या शिवसेना आमदारांनी आत जाऊ देत नसाल तर गेटवर बसू अशी भूमिका घेतली. चंद्रकांत पाटील यांनी बैठकीला बोलवून अशाप्रकारे पोलिसांनी अडवणूक केल्यामुळे आमदार संतप्त झाले आहे. 

'जम्मू-काश्मीर प्रकरणात पाकिस्तानने हस्तक्षेप करण्याची गरज नाही'