पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेचे खासदार- आमदार एक महिन्याचे वेतन देणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस

शिवसेनेचे नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत

शिवसेनेचे खासदार- आमदार यांनी देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आपले एक महिन्याचे वेतन देण्याचं ठवरलं आहे. कोरोना विषाणूशी लढा देण्याकरता मदत करावी  असं आवाहन यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. त्यानंतर अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक, सेलिब्रिटी, नेत्यांनी पुढे येत  आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

राज्यातील ११ हजार कैद्यांना पॅरोलवर सोडणार: गृहमंत्री

या पार्श्वभूमीवर  शिवसेनेचे खासदार- आमदार हे देखील आपल्या एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार असल्याची माहिती पक्षाचे नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी ट्विटवर दिली आहे. ही मदत जाहीर करताना कोरोना विरुध्दच्या लढाईत हा आमचा खारीचा वाटा आहे, असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे युद्ध आपण नक्की जिंकू, असा विश्वासही त्यांनी आपल्या ट्विटरवर व्यक्त केला आहे. 

कोरोना : CRPF कडून ३३ कोटी ८१ लाख रुपयांची मदत

तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे सदस्य एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देतील तर संसदेतील राष्ट्रवादीचे लोकसभा आणि राज्यसभा सदस्य एक महिन्याचे वेतन प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी देतील, अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.