पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येला जाणार: संजय राऊत

संजय राऊत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येला जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांचा अयोध्येला जाण्याचा कार्यक्रम तयार झाला आहे. अयोध्येच्या मुद्द्यावरुन राजकारण करु नये. हा आमच्या श्रध्देचा विषय आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

कोणाला तरी वाचविण्यासाठी भीमा-कोरेगावचा तपास NIA कडे - अनिल देशमुख

उद्धव ठाकरे ७ मार्च रोजी आयोध्येला जाणार असून त्यांच्यासोबत देशभरातील हजारो शिवसैनिक जाणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. अयोध्येमध्ये मुख्यमंत्री रामल्लाचं दर्शन घेतील. तसंच शरयू तीरावर आरती करतील, असे देखील त्यांनी सांगितले. राम मंदिर हा आमचा श्रध्देचा विषय आहे त्यामुळे यात राजकारण होता कामा नये. याला राजकीय दृष्टीने पाहून नये अशी आमच्या सर्वांची इच्छा असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. 

फेशियल रेकग्निशन, ड्रोन्स, सीसीटीव्ही; संचलनासाठी दिल्लीत

दरम्यान, उद्धव ठाकरे आयोध्या दौऱ्यावर जाताना राहुल गांधी यांना घेऊन जाणार का? असा सवाल भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केला होता. याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'राम मंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला तेव्हा काँग्रेस पक्षाने त्याचे स्वागत केले होते. हे भाजप विसरली आहे. तसंच अयोध्येत भगवे राम मंदिर उभे रहावे अशी इच्छा एका काँग्रेसच्या नेत्याने व्यक्त केली होती, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

निर्भया प्रकरणातील चारही दोषींवर सतत लक्ष ठेवलं जातंय, का

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:shivsena leader sanjay raut says maharashtra cm uddhav thackeray will visit ayodhya on 7th march