पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संजय राऊतांकडून इंदिरा गांधी-करीम लाला भेटीचे वक्तव्य मागे

संजय राऊत

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि कुख्यात गुंड करीम लाला यांच्या भेटीविषयी केलेले वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मागे घेतले आहे. 'इंदिरा गांधींविषयीच्या वक्तव्यामुळे कोणी दुखावले गेले असेल तर मी माझे वक्तव्य मागे घेतो', असे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, 'माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या कुख्यात गुंड करीम लाला याला भेटण्यासाठी मुंबईमध्ये यायच्या, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्याच्या या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसने हे वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली होती.

घड्याळवाले आता आमचे पार्टनर, उद्धव ठाकरेंची शरद पवारांवर

संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना इंदिरा गांधींविषयी केलेले वक्तव्य मागे घेत असल्याचे  सांगितले. 'काँग्रेसमधील मित्रांना माझ्या वक्तव्यामुळे दुखवण्याची गरज नाही. माझ्या वक्तव्यामुळे इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला इजा पोहचली असेल किंवा एखाद्याच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे इंदिरा गांधीविषयीचे वक्तव्य मागे घेतो, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

PMC बँक आरोपींबाबत हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

दरम्यान, संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य चूकीचे असून त्यांनी ते मागे घ्यावे अशी मागणी काँग्रेसचे नेते संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांनी केली होती. तसंच, संजय राऊत यांनी सकाळी ट्विट करत स्पष्टिकरण देखील दिले होते. त्यांनी असे म्हटले होते की, करीम लाला एक पठाणांचा नेता होता. सर्वच राष्ट्रीय नेते त्याची भेट घेत असत. इंदिरा गांधी सुध्दा पठाणांचा नेता म्हणूनच त्याला भेटल्या होत्या. तसंच मी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांचा आदर करतो.' असे त्यांनी सांगितले आहे. 

गुन्हा दाखल करत संजय राऊतांना अटक करा: राम कदम

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:shivsena leader sanjay raut says if someone someones feelings hurt i take back my statement