पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'काश्मीरला भारत मुक्त करा असे म्हटले तर खपवून घेणार नाही'

संजय राऊत (ANI)

जेएनयू हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान एका तरुणीने 'फ्री काश्मीर'चे पोस्टर झळकावले. या पोस्टरवरुन भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. फ्री काश्मीरच्या पोस्टरवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. याला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.

जेएनयू हल्ला : व्हॉट्स अ‍ॅप मेसेज, फोटोंमुळे संशयाची सुई अभाविपकडे?

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना असे सांगितले की, पोस्टर झळकावलेल्या मुलीने फ्री काश्मीरचा अर्थ सांगितल्याचे मी वृत्तपत्रामध्ये वाचले. फ्री काश्मीरचा अर्थ काश्मीरची निर्बंधातून मुक्तता करा असा होतो. काश्मीरमध्ये इंटरनेट, मोबाईल सेवा बंद आहे तसंच आणखीही काही प्रकारचे निर्बंध लागू आहेत. त्या निर्बंधातून काश्मीरला मुक्त करा, अशी मागणी आंदोलनकर्ती तरुणीने केली आहे. दरम्यान, काश्मीरला भारतापासून मुक्त करा असे कोणी म्हणत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असे संजय राऊत यांनी खडसावले आहे.

JNU हिंसाचारः आझाद मैदानावरील विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

गेट वे ऑफ इंडिया येथे जेएनयू हिंसाचाराच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनात एका तरुणीने फ्री काश्मीरचे पोस्टर्स झळकावले. त्यानंतर फडणवीस यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना अनेक सवाल उपस्थित केले होते. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले होते की, 'निषेध नेमका कशासाठी आहे?, फ्री काश्मीरच्या घोषणा का?, मुंबईतील अशा फुटीरवादी घटकांना आपण कसे सहन करू शकता?, सीएमओ कार्यालयापासून २ कि.मी अंतरावर आझादी टोळीच्या ‘फ्री काश्मीर’च्या घोषणा? उद्धवजी तुम्ही ही फ्री काश्मीर विरोधी भारत मोहीम सहन करणार आहात का ?, असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले होते. 

देश संकटात आहे, मोदी-शहांना जे हवंय तेच घडतंय, शिवसेनेचा आरोप

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:shivsena leader sanjay raut says if anyone talks of freedom of kashmir from India then it will not be tolerated