पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रत्येक पक्षात अंतर्गत कुरबुरी असू शकतात: संजय राऊत

संजय राऊत (ANI)

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी सोहळा झाल्यानंतर नेत्यांमध्ये नाराजीनाट्य पहायला मिळाले आहे. शिवसेनेमधील अनेक दिग्गज नेते मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज आहेत. शिवसेनेतील नाराजीनंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, प्रत्येक पक्षात अंतर्गत कुरबुरी असू शकतात. नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुख्यमंत्री स्वत: नाराजांसोबत चर्चा करतील, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

तीन चाकांचे सरकार जास्त काळ धावू शकणार नाही: रामदास आठवले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिलेला शब्द कायम पाळतात, असे संजय राऊत यांनी सांगितले. खातेवाटपावरुन महाविकास आघाडीचे अनेक नेते नाराज झाले आहेत. महाविकास आघाडीकडून सुकाणू समिती नेमली जाईल. सुकाणू समितीच्यावतीने समन्वय साधला जात आहे तसंच प्रश्न सोडवले जातील, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसंच, नाराज झालेल्यांशी स्वत: मुख्यमंत्री चर्चा करतील. सर्व वातावरण शांत होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कस्टोडियनकडून ४ कोटी
 

दरम्यान, खाते वाटपासंदर्भात तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून चर्चा करत आहेत. आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप होईल. अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. खातेवाटपाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून विलंब झालेला नाही. पक्षानुसार खातेवाटप झाले नाही. खातेवाटपाचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. मात्र तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून खातेवाटप केले असल्याचे, संजय राऊत यांनी सांगितले आहे. 

राजस्थानात १०० बालकांचा मृत्यू; मायावतींची काँग्रेस,