पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बुलंदशहराच्या घटनेचे पालघरप्रमाणे राजकारण करु नका: संजय राऊत

संजय राऊत

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरामध्ये दोन साधूंची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पालघर प्रकरणावरुन राजकारण करणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. बुलंदशहराच्या घटनेचे पालघरप्रमाणे राजकारण करु नका. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील, असे त्यांनी सांगितले आहे. 

सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांच्या उपचार पद्धतीत मोठा बदल

बुलंदशहरातील घटनेनंतर संजय राऊत यांनी ट्विट केले. त्यांनी या ट्विटमध्ये ही घटना अत्यंत निर्घृण आणि अमानुष असल्याचे म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील मंदिरात दोन संत साधुंची हत्या झाली आहे. सर्व सबंधीतांना आवाहन आहे या विषयाचे कोणी पालघरप्रमाणे राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. शांतता राखा. योगी अदित्यनाथ हे गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील, असे त्यांनी म्हटले आहे. 

टिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरामध्ये सोमवारी रात्री उशिरा दोन साधूंची हत्या करण्यात आली आहे. अनपशहरच्या पगोना गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. गावातील शिव मंदिरामध्ये जगनदास (५५ वर्ष) आणि सेवादास (३५ वर्ष) हे दोन साधू गेल्या १० वर्षांपासून राहत होते. रात्री झोपेत असताना या साधूंची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरण आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे बुंलदशहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईतील ५५ पेक्षा जास्त वयाचे पोलिस घरी थांबले तरी चालेल - आयुक्त