पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ज्यांच्या मनात पाप तेच सत्तेसाठी पर्यायांबद्दल बोलतात, संजय राऊतांचा भाजपला टोला

शिवसेना खासदार संजय राऊत

ज्यांच्या मनात पाप आहे. तेच सत्तास्थापन करण्यासाठी पर्याय असल्याचे बोलतात. शिवसेनेचे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच मन एकदम साफ आहे. त्यामुळे आम्ही पर्यायांबद्दल बोलत नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. गुरुवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला. स्वतः मंत्री होणार आहे का, हे आधी सुधीर मुनगंटीवार यांनी बघावे, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.

सत्तापदांच्या समान वाटपासाठी शिवसेना आग्रही, लढत राहण्याचे वचन

सत्तापदांचे समान वाटप याबाबत शिवसेना आग्रही असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला. मुख्यमंत्रीपदही सत्तापदांमध्येच येते. त्यामुळे त्याचेही समान वाटप केले गेले पाहिजे, असे शिवसेनेने म्हटले आहे. 'सामना'च्या अग्रलेखामधूनही गुरुवारी हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. 

संजय राऊत म्हणाले, भाजपला एकट्याच्या बळावर राज्यात जनादेश मिळालेला नाही. राज्यात जो जनादेश मिळाला आहे. तो भाजप-शिवसेना युतीला मिळालेला आहे. शिवसेनेचेही या जनादेशामध्ये योगदान आहे. त्यामुळे आधी ठरल्याप्रमाणे भाजपने सर्वांना सोबत घेऊन पुढे गेले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सत्तास्थापन कऱण्यासंदर्भात गेल्या काही दिवसांमध्ये भाजप-शिवसेनेमध्ये कोणतीही चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आयसिसच्या म्होरक्याविरोधातील कारवाईचा व्हिडिओ अमेरिकेकडून जारी

सत्तापदांच्या वाटपावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात अद्याप एकमत झालेले नाही. मुख्यमंत्रीपदासह सर्व सत्तापदांचे समसमान वाटप करण्याचा शिवसेनेचा आग्रह आहे. तर मुख्यमंत्रीपदासह गृह, महसूल, नगरनियोजन ही महत्त्वाची खाती शिवसेनेला देण्यास भाजपने नकार दिल्याची माहिती आहे.