पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजित पवारांनी राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला: संजय राऊत

संजय राऊत

राज्यामध्ये भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन झाले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन करुन मुख्यमंत्री होऊ पाहणाऱ्या शिवसेनाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. भाजपने राजभवाचा दुरुपयोग केला आहे. पैसा आणि सत्तेचा गैरवापर करुन रात्रीच्या अंधारात राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला फसवले आहे याची किंमत त्यांना चुकवावी लागेल, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

 ज्या घडामोडी झाल्या आहेत त्याचा शरद पवार यांचा काहीह संबंध नाही. अजित पवारांनी राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. तसंच शरद पवारांना दगा दिला असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. अजित पवार यांनी जो निर्णय घेतला त्यापेक्षा अजित पवारांना फोडण्याचा जो प्रयत्न झाला त्याला जनता उत्तर देईल असे देखील संजय राऊत यांनी सांगितले. आहे. तसंच भाजपने दबाव टाकून, धमक्या देऊन अजित पवार आणि त्यांच्या आमदारांना फोडले आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

 

राज्याला खिचडी सरकारची नाही तर स्थिर सरकारची गरज

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रात्रीच्या अंधारात शपथ घेतली यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली आहे. रात्रीच्या आधारात पाप होते. चोरून पाप केले जाते दरोडा घातला जातो असे त्यांनी सांगितले आहे. ज्यांनी या वयात शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला दगा देण्याचा प्रयत्न केला ही महाराष्ट्राला न आवडणारी गोष्ट आहे. अजित पवारांसोबत गेलेल्या लोकांनी छत्रपतींच्या महाराष्ट्राला काळीमा फासली आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्यात भाजप-राष्ट्रवादीचे सरकार; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री