पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेनेचा संपर्क फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीशी'

संजय राऊत

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचा निर्णय पक्का आणि अंतिम झाला आहे. हे राज्य आम्हाला पुढच्या पाच वर्ष चालवायचे आहे अशी आमची भूमिका ठरली आहे, असे मत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी वक्त केले. संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मुंबईमध्ये बैठक होईल. येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय येऊल, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. 

दाभोलकर हत्या प्रकरण: पुनाळेकर आणि भावेंविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल

एकसुत्री कार्यक्रमावर बुधवारी आघाडीची बैठक झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी फोनवरुन चर्चा केली. पुढील दोन दिवसात अंतिम निर्णयावर पोहचतील, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसंच, रात्री आघाडीची बैठक लांबली होती. त्यामुळे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

भाजपला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही: सुभाष देशमुख

दरम्यान, सरकार स्थापनेसंदर्बात आमचा संपर्क फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सुरु आहे. सरकार स्थापनेसंदर्भात आमचा संपर्क उत्तम पध्दतीने सुरु आहे. १ डिसेंबरपूर्वी सरकार स्थापनेची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार येणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तसंच, सोनिया गांधींना भेटण्याचे अद्याप प्रयोजन नाही, असे देखील त्यांनी सांगितले. 

सत्ता संघर्ष मिटणार, पण आघाडी-सेनेचा फॉर्म्युला गुलदस्त्यातच