पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आधी सावरकरांना भारतरत्न द्या, मोदींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो'

अनिल परब

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीदिनानिमित्त राज्य सरकारनं त्यांच्या गौरवाचा दोन ओळींचा प्रस्ताव मांडावा, अशी मागणी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. मात्र, 'आधी सावरकरांना 'भारतरत्न' द्या. आम्ही तुमच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो, असं प्रत्युत्तर शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी दिले आहे. त्यावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला

'स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा की नाही द्यावा हे आधी सांगावे, असा सवाल अनिल परब यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरुन गोंधळ घालणाऱ्या भाजपला केला आहे. केंद्रामध्ये असलेल्या मोदी सरकारने जर स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न दिला. तर आम्ही मोदींसह तुमचा देखील अभिनंदनाचा प्रस्ताव मांडू, असे प्रत्युत्तर अनिल परब यांनी दिले. 

दिल्ली हिंसाचाराविरोधात काँग्रेस काढणार शांतीमार्च

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात यावा अशी मागणी भाजपने केली होती. यावरुन सत्ताधारी आणि भाजपमध्ये खडाजंगी झाली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नियमांवर बोट ठेवून सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. त्यांनी सभागृहात पोस्टरबाजी करत घोषणा दिल्या. 

दिल्लीत तातडीने लष्कर तैनात करा; केजरीवालांची गृहमंत्रालयाकडे मागणी