पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... हे गोंधळलेल्या मनःस्थितीचे लक्षण, शिवसेनेची राज ठाकरेंवर टीका

राज ठाकरे

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलणे आणि हिंदुत्वाचा प्रखरपणे वापर करणे या मुद्द्यांवरून शिवसेनेने शनिवारी त्यांच्यावर तोफ डागली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली. पक्षासाठी एक नव्हे दोन झेंड्यांची योजना करणे हे गोंधळलेल्या मनःस्थितीचे किंवा घसरलेल्या गाडीचे लक्षण आहे. त्याचबरोबर विचार उसना असला तरी हिंदुत्वाचाच आहे. झेपेल तर पुढे जा, अशी टीका राज ठाकरे यांच्यावर करण्यात आली आहे.

एल्गार परिषदेचा तपास एनआयए करणार

मनसेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन गुरुवारी मुंबईत झाले. या अधिवेशनात राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या नव्या झेंड्यांचे अनावरण केले. त्याचवेळी हिंदुत्वाचा प्रखरपणे वापर करून यापुढे वाटचाल करणार असल्याचे आपल्या भाषणातील मुद्द्यांतून स्पष्ट केले. त्या पार्श्वभूमीवर लिहिण्यात आलेल्या अग्रलेखामध्ये म्हटले आहे की, शिवसेनेने मराठीच्या मुद्द्यावर भरपूर काम करून ठेवले आहे. त्यामुळे मराठी मनास साद घालून हाती काहीच लागले नाही. लागण्याची चिन्हे नाहीत. भारतीय जनता पक्षाला हवे आहे म्हणून राज ठाकरे यांनी हिंदू बांधव, भगिनी, मातांनो... अशी साद घातली असा टीकेचा सूर आहे. येथेही हाती काही लागेल याची शक्यता कमीच आहे. शिवसेनेने प्रखर हिंदुत्वाच्या विषयावरही देशभरात मोठे जागरण आणि काम केले आहे. मुख्य म्हणजे शिवसेनेने हिंदुत्वाचा भगवा रंग कधीच सोडला नाही, असे अग्रलेखात लिहिले आहे.

'दिल तो हॅप्पी है जी' फेम अभिनेत्रीने गळफास घेऊन संपवले आयुष्य

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. यास रंग बदलणे कसे म्हणता येईल, असा प्रश्न अग्रलेखात विचारण्यात आला आहे. त्याचबरोबर याबाबत आक्षेप कमी व पोटदुखी जास्त. भाजप किंवा इतरांनी अगदी मेहबुबापासून इतर कुणाशीही निकाह लावला तरी चालतो. पण ही राजकीय व्यवस्था इतर कोणी केली की ते पाप ठरते. आम्ही सरकार स्थापन केले हे पाप नसून समाजकार्य आहे, असेही अग्रलेखात लिहिली आहे.