पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण?, शिवसेनेचा सवाल

शिवसेना

शिवसेनेला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून अर्थात एनडीएमधून बाहेर काढण्याच्या घोषणेवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून टीका करण्यात आली आहे. शिवसेनेला एनडीएमधून बाहेर काढणारे तुम्ही कोण, असा प्रश्न अग्रलेखामधून विचारण्यात आला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी शिवसेना आता एनडीएमध्ये नसल्याचे पत्रकारांना सांगितले. शिवसेना महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी बोलणी करीत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील त्यांच्या एकमेव मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते आता एनडीएमध्ये नाहीत. ते संसदेमध्येही विरोधी बाकांवर बसणार आहेत, असे प्रहाद जोशी यांनी सांगितले. त्यानंतर शिवसेनेने या निर्णयाचा ठाकरी शब्दांमध्ये खरपूस समाचार घेतला.

सियाचीनमध्ये हिमस्खलन, ४ जवानांसह २ पोर्टर मृत्युमुखी

अग्रलेखामध्ये म्हटले आहे की, बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, प्रकाशसिंह बादल अशा दिग्गजांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पाया घातला तेव्हा आजचे दिल्लीश्वर गोधडीत रांगतसुद्धा नसावेत. काहींचा तर जन्मही झाला नसावा. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठका होत व महत्त्वाचे निर्णय साधकबाधक चर्चा करून घेतले जात होते. जॉर्ज फर्नांडिस हे एनडीएचे निमंत्रक होते आणि अडवानी प्रमुख होते. आज एनडीएचे निमंत्रक कोण आहेत याचे उत्तर मिळेल काय, शिवसेनेला बाहेर काढण्याचा निर्णय कोणत्या बैठकीत आणि कोणत्या आधारावर घेतला, असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

ज्या एनडीएचे अस्तित्त्वच मागच्या साडेपाच वर्षांत पद्धतशीरपणे नष्ट केले त्या एनडीएतून शिवसेनेस बाहेर काढले. अंहकारी आणि मनमानी राजकारणाच्या अंताची ही सुरुवात आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. 

चुकून सीमा ओलांडून गेलेल्या भारतीयांवरून पाकचे 'नापाक' राजकारण

शिवसेनाप्रमुखांच्या संघटनेस एनडीएतून बाहेर काढण्याचा मुहूर्त मिळाला तो देखील शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथीचा. स्वतःस हरिश्चंद्राचा अवतार मानणाऱ्यांनी हरिश्चंद्रासारखे वर्तन केले नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी राजांचा आहे अशा मंबाजींना तो साथ देणार नाही. मंबाजींच्या राजकारणाची उलटी गिनती सुरू झाली आहे, असेही या अग्रलेख म्हणण्यात आले आहे.