पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महत्वाची बैठक; आज सरकार स्थापनेचा दावा?

सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे

राज्यामध्ये सरकार स्थापनेचा तिढा लवकरच सुटणार आहे. विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर ३० दिवसानंतर सरकार स्थापनेची प्रतिक्षा संपण्याची चिन्ह आहेत. प्रदिर्घ चर्चेनंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष शुक्रवारी सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुपारी ३ वाजता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीनंतर संध्याकाळी तिन्ही पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; ठाकरे-पवार यांच्यात एकतास चर्चा

गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरु आहे. या बैठकीमध्ये किमान समान कार्यक्रम तयार झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुरुवारी रात्री मुंबईत दाखल झाले. आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मित्रपक्षांसोबत दुपारी १२ वाजता बैठक होणार आहे. 

उद्धव ठाकरेंविरोधात औरंगाबादमधील पोलिस ठाण्यात तक्रार

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यामध्ये संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये दोन्ही पक्ष शिवसेनेसोमर किमान समान कार्यक्रम मांडणार आहेत. या बैठकीनंतर तिन्ही पक्ष राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यात लवकरच सत्ता स्थापनेचा तिढा सुटून नव्या सरकारची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

सत्ता स्थापनेमध्ये काँग्रेसला 'न्याय' मिळणार का?