पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पिक विम्यासंदर्भात १७ जुलै रोजी शिवसेनेचा मोर्चा

उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांना पिक विमा योजनेसंदर्भात येणाऱ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे.शिवसेनेच्या वतीने बुधवारी १७ जुलै रोजी विमा कंपन्यांवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली. हा मोर्चा शेतकऱ्यांचा नसून शेतकऱ्यांसाठी आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्यांना धमकी वजा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या योजनेमध्ये काही त्रुटी आहेत का? यासंदर्भात तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्याचेही ते यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाबाबतच्या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिले. केंद्राकडे स्वतंत्र कृषी आयोगाची मागणी केली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांबाबतच्या अर्थसंकल्पाचा वेगळा विचार होईल, असे त्यांनी सांगितले. 

आमचं ठरलंय म्हटल्यावर फुकटचे वाद कशाला?: उद्धव ठाकरे

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंर्तगत शेतकऱ्यांना विम्याचे दावे मिळवून देण्यासाठी शिवसेना पिक विमा कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. दुष्काळी परिस्थिती तसेच पिकाचा विमा असताना देखील शेतकऱ्याना पीक विम्याचा लाभ देण्यास विमा कंपन्या टाळाटाळ करत आहेत. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:shivsena chief uddhav thackeray warns crop insurance companies press conference in mumbai