पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ईडीच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही'

उद्धव ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवत २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. राज ठाकरे यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षांनी पाठिंबा दिला. शिवसेना याबाबत नेमकी काय भूमिका घेतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. उद्याच्या ईडीच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही, असे मत उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

उत्तराखंडः मदतकार्यासाठी जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, तिघांचा मृत्यू

दरम्यान, राज ठाकरे यांना कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणी ईडीने नोटीस पाठवत २२ ऑगस्टला हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. भाजप सरकार सूडाचे राजकारण करत असल्याची टीका मनसेच्या नेत्यांनी केली आहे. याविरोधामध्ये मनसेने ठाणे बंदची हाक दिली होती तसंच ईडी कार्यालयावर राज्यभरातील सर्व कार्यकर्त्यांसह धडकणार असल्याचे देखील सांगितले होते. मात्र राज ठाकरे यांनी हस्तक्षेप करत त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आणि ईडी कार्यालयाबाहेर कोणी येऊ नये असे आवाहन केले. 

निर्मला गावित आणि रश्मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेश

दरम्यान, राज ठाकरे यांना त्यांचे भाऊ उध्दव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. उद्या ईडीच्या चौकशीमधून काहीच निष्पन्न होणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. याबाबत जास्त बोलण्यास उध्दव ठाकरे यांनी नकार दिला. आज माजी आमदार निर्मला गावित आणि राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी शिवेनेत प्रवेश केला. यावेळी राज ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर उध्दव ठाकरे यांनी हे उत्तर दिले. 

चिदंबरम यांना दुसरा धक्का, ईडीकडून लुकआऊट नोटीस जारी