पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेकडून खबरदारी; बैठकीनंतर सर्व आमदारांना एकाच हॉटेलमध्ये ठेवणार

शिवसेना बैठक

राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये शिवसेना सत्तास्थापनेबाबतची आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. दरम्यान, एका खासगी वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीनंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईतील ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. शिवसेनेचा एकही आमदार फुटू नये यासाठी शिवसेनेकडून ही काळजी घेण्यात येणार आहे.  

 

'महाराष्ट्रासाठी आता एकच गोड बातमी, शिवसेनेचा मुख्यमंत्री'

राज्यामध्ये विधानसभा निवडणूक निकाल लागून १४ दिवस झाले तरी सुध्दा सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप काही सुटलेला नाही. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षामध्ये सत्ता स्थापनेवरुन वाद सुरुच आहे. सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरुच आहे. अशातच शिवसेनेच्या बैठकीनंतर एकही आमदार फुटू नये, तसंच या आमदारांचा इतर कोणत्याही पक्षाशी संपर्क होऊ नये यासाठी शिवसेना आपल्या सर्व आमदारांना एकाच ठिकाणी ठेवणार आहे. पुढचे काही दिवस हे आमदार याच ठिकाणी राहणार असल्याचे सांगितले जात आहे. 

सत्ता स्थापनेचा तिढा कायम; काँग्रेस नेते सोनिया गांधीची भेट