पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनं जुळली आता एका युतीची दुसरी गोष्ट : उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

फुटणार नाही तुटणार नाही घेतलेला हिंदुत्वाचा वसा सोडणार नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपसोबतच्य युतीमध्ये आता कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेच्या वर्धापन दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार असल्याने चांगली चर्चा रगंली होती. मुख्यमंत्र्यांचे औपचारिक आभार मानताना उद्धव म्हणाले की, शिवसैनिक एक वेगळं रसायन आहे, प्रेम करु म्हटलं तर असे करेन की विचारु नका आणि लढ म्हटले तर असे लढेल तेही विचारु नका! आपल्यामध्ये मोकळे ढाकळे वातावरण कायम ठेवूयात अशा शब्दांतून त्यांनी सेना-भाजप यांच्यात दूरावा निर्माण होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. 

संघर्षाचा काळ असतो कसोटीचा काळ असतो त्यावेळी तुम्हाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते का? असा प्रश्न मला कोणीतरी विचारला होता. पण मी प्रामाणिकपणे सांगतो की, अशा काळात मला त्यांची आठवण येत नाही. कारण त्यांनी मला तेवढी जिद्द आणि सवंगडी दिले आहेत.जेव्हा आनंदाचे क्षण येतात तेव्हा मात्र मला शिवसेना प्रमुखांची आठवण येते. त्यांच्यासोबत पक्षांसाठी कष्ट घेतलेल्या प्रत्येक नेत्यांची आणि प्रत्येक शिसैनिकाची आठवण येते, अशा शब्दांत त्यांनी शिवसेना प्रमुख आणि पक्षाला उभारी देणाऱ्या कार्यकर्त्यांविषयीच्या भावना व्यक्त केल्या. 

आमचं ठरलंय! आधी प्रचंड बहुमतानं विजय मिळवू : फडणवीस

भाजप-शिवसेना यांच्यातील युतीबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, यापूर्वी केलेली युती आणि यावेळी केलेली युती एका भावनेतून केली आहे. भावना आधारित युती दुसऱ्या कोणत्याही पक्षामध्ये नाही. विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत बुवा-भतीजा एकत्र आले. पण त्यांच्यात कोणताच विचार नसल्यामुळे ते आपटले, असे सांगत त्यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बसपाच्या प्रमुख मायवती यांनाही टोला लगावला. एवढ्यावर ते थांबले नाहीत तर त्यांनी काँग्रेसवरही तोफ डागली. 

आमच्यात जो वाद झाला होता तो तुझं माझं करण्यासाठी नव्हता तर मुलभूत विषयावर होता. ते मी जाहीरपणे बोललो होते, असे सांगत सध्याच्या युतीसाठीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल उद्धव ठाकरे यांनी मुख्यंत्र्यांचे आभार मानले. तुम्ही आणि भाजप अध्यक्ष अमित शहा भेटीसाठी आला. आपल्यात जी चर्चा झाली त्यामध्ये मी मांडलेले मुद्दे तुम्ही काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे फक्त मान हलवून सोडून दिले नाही. तुम्ही त्याच्यावर निर्णय घेतला. त्याच्यावर कामकाज सुरु झाले, यातून त्यांनी भाजप-शिवसेना चर्चा सत्र सकारात्मक असल्याचे सांगितले.

 पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच, वर्धापनदिनी पक्षाचा निर्धार

आमच्यातील दूरावा आता पूर्णपणे संपला आहे. आपल्यात एकोपा आहे तो कायम ठेवायचा आहे. मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत आपल्या भाषणाच्या समारोपाला उद्धव म्हणाले की, मुख्यमंत्री साहेब दोन्ही मनं जुळलेली आहेत आता एका युतीची दुसरी गोष्ट महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला दाखवून देवू.