पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवाजी महाराजांच्या वंशजांनी राजीनामे द्यावेतः संजय राऊत

छत्रपती संभाजी राजे, उदयनराजे आणि शिवेंद्र राजे

छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या वादग्रस्त पुस्तकावरुन शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे. नरेंद्र मोदी हे जरी पंतप्रधान असले तरी छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. त्यामुळे मोदींची महाराजांशी केलेली तुलना योग्य नाही. नेहमी कुठल्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देणाऱ्या राज्यातील भाजप नेत्यांना हे मान्य आहे का, भाजप नेते मूग गिळून का गप्प आहेत, असा सवाल राऊत यांनी केला. महाराजांचे वंशज आज भाजपमध्ये आहे. याबाबत कोल्हापूर, सातारा गादीच्या वंशजांनी भूमिका घ्यावी. हा राज्याचा अपमान आहे. छत्रपती शिवरायांच्या वारसदारांनी त्वरीत आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. मुंबई येथे प्रसारमाध्यमांसमोर ते बोलत होते. 

उद्धवजी राऊतांना आवरा, मुजोरी खपवून घेणार नाही, संभाजीराजे भडकले

छत्रपतींच्या गाद्यांचे वारसदार आज भाजपमध्ये आहेत. त्यांनी यावर बोलावे. महाराज हे राज्याचे दैवत आहेत. महाराष्ट्रातील जनता बोलतेय. महाराजांच्या वारसदारांनी बोललेच पाहिजे. त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी राऊत यांनी केली. 

आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तक भाजपने मागे घ्यावे. छत्रपती शिवरायांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. कोणतीही घटना घडल्यानंतर तात्काळ प्रतिक्रिया देण्यास भाजपचे नेते पुढे येत असतात. वीर सावरकर यांच्याबद्दल त्यांनी लगेच आपली भूमिका मांडली होती. त्यांनी आता छत्रपतींबद्दल आपली भूमिका मांडावी. 

मोदींची काय कुणाचीचं तुलना महाराजांशी होऊ शकत नाही : छ.संभाजीराजे BJP वर भडकले

राज्यातील नेते आता काहीच बोलायला तयार नाहीत. भाजपने या पुस्तकाशी आपला संबंध नसल्याचे जाहीर करावे. राज्यातील नेते आता मूग गिळून गप्प का, असा सवाल राऊत यांनी यावेळ उपस्थित केला.