पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव ठाकरेंविरोधात FB पोस्ट भोवली, शिवसैनिकांकडून तरुणाचे अर्धमुंडण

हिरामणी तिवारी (ANI)

सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोस्ट लिहिणे मुंबईतील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फेसबुक पोस्ट लिहिल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी वडाळा टीटीतील शांतीनगर येथील रहिवासी हिरामणी तिवारीशी केवळ गैरवर्तनच केले नाही तर त्याचे अर्धमुंडणही केले. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी परस्पर तक्रार नोंदवण्यात आली आहे. 

झारखंडच्या जनेतेने आर्थिक दहशतवाद झुगारला, शिवसेनेची भाजपवर टीका

तिवारीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन्ही पक्षाकडून परस्परविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचे मुंबई पोलिस प्रवक्ते पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले. 

जामिया मिलिया इस्लामियामध्ये झालेल्या हिंसात्मक आंदोलनावर मत नोंदवताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची तुलना जालियनवाला बाग घटनेशी केली होती. तिवारीने उद्धव ठाकरे यांच्या त्या वक्तव्यावर एक आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकली होती. 

झारखंड विधानसभा निकाल, PM मोदी म्हणाले की, ...

त्या फेसबुक पोस्टमुळे संतापलेले शिवसैनिक सोमवारी दुपारी तिवारीच्या घरी गेले. त्याला मारहाण करत त्याचे अर्धमुंडण केले. शिवसेनेच्या स्थानिक शाखेतील २ ते ३ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वडाळा पोलिस पुढील तपास करत आहेत.