पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे शिवसेनेला मुंबईत पहिला धक्का

रमेश सोळंकी आणि आदित्य ठाकरे

सत्तेसाठी हिंदुत्व सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसण्याचा शिवसेनेचा निर्णय सर्वच शिवसैनिकांना आवडलेला नाही. याचा प्रत्यय बुधवारी आला. शिवसेना नेतृत्त्वाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत युवासेनेच्या एका पदाधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी मंगळवारी रात्रीच आपल्या पदाचा राजीनामा दिला.

... म्हणून मुख्यमंत्र्यांशिवाय आमदारांचा शपथविधी पार पडला

रमेश सोळंकी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, युवासेनेतील माझ्या पदाचा मी राजीनामा देतो आहे. मुंबईच्या, महाराष्ट्राच्या लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे आभार. 

वैचारिक मतभेदांमुळे मी कधीच काँग्रेससोबत काम करू शकणार नाही. त्याचवेळी झोकून देऊन काम करण्याची माझी वृत्ती आहे. मनाविरुद्ध मी काम करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

योग्यवेळी योग्य गोष्टी सांगेन, काळजी करु नकाः देवेंद्र फडणवीस

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन आघाडी करण्यामुळे शिवसेनेला पहिल्यांदाच धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे गुरुवारी संध्याकाळी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.