पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पूरग्रस्त भागात शिवसेना आरोग्य शिबिरांचे आयोजन करणारः उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे (ANI)

कोल्हापूर, सांगली भागातील महापूर आलेल्या भागाला आपण भेट देणार असून आपल्याबरोबर युवकांची कुमक घेऊन जाणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच महापुराच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची संवाद यात्रा थांबवण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले.

पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांचे १०० टक्के कर्जमाफ कराः शरद पवार

पूरग्रस्त भागात सध्या शिवसेनेकडून मदत सुरु आहेत. ही मदत आणखी वाढवू. पण पूर ओसरल्यानंतर आरोग्याचे संकट निर्माण होते. यापूर्वी मुंबईला आलेल्या पुरावेळी शिवसेनेने आरोग्य शिबिरे आयोजित केली होती. आता कोल्हापूर, सांगली आणि सातारा भागातही शिवसेनेच्या वतीने आरोग्य शिबिरे घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. शिवसेनेची आदित्य संवाद यात्रा थांबवल्याचेही त्यांनी यावेळी सांगितली.

तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारने पाणी ओसरताच त्वरीत नुकसानीचे पंचनामे करावेत अशी सूचना देत पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांचे १०० टक्के कर्ज माफ करावे, अशी आग्रही मागणी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले होते.

आलमट्टीतून पाच लाख क्युसेक्सने विसर्ग, सांगलीतील पूर कमी होणार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:shiv sena will start health camp in flood affected areas says uddhav thackeray sangli kolhapur satara flood