पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आरेतील वृक्षतोड रोखण्यासाठी शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार

शिवसेना

मेट्रो-३ च्या कारशेडसाठी आरे कॉलनीमध्ये वृक्षतोड सुरु आहे. या वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक, राजकीय पक्ष यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी विरोध केला आहे. या वृक्षतोडीचे पडसाद शनिवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये उमटले. यावेळी भाजप सोडून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी या वृक्षतोडीचा तीव्र निषेध नोंदवला. मेट्रो कारशेड आणि आरेतील वृक्षतोड रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी घेतला आहे. 

कामाला नाही मतदानाला जायचं! मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर

कुलाबा ते सीप्झ या मेट्रो - ३ प्रकल्पासाठी तयार करण्यात येणाऱ्या कारशेडला विरोध करणाऱ्या सर्व याचिका शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावल्या. त्यामुळे या कारशेडचा मार्ग मोकळा झाला. हाय कोर्टाच्या निर्णयामुळे पर्यावरण प्रेमींसह सर्वांनाच धक्का बसला होता. हायकोर्टाने वृक्षतोडीला परवानगी दिल्यानंतर त्याच दिवशी रात्री वृक्षतोडीला सुरुवात करण्यात आली. आरेतील जवळपास  २,६५६ झाडे तोडण्यात येणार आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या पर्यावरणप्रेमींसह स्थानिक नागरिकांनी आंदोलनाला सुरुवात केली. 

कामाला नाही मतदानाला जायचं! मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर

आंदोलनकर्ते आणि पोलिसांच्यामध्ये वाद झाल्यानंतर आरे परिसरामध्ये पोलिसाचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसचं या परिसरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर २९ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरेतील वृक्ष तोडीप्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करावा यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका देखील कोर्टाने फेटाळून लावली. 

कामाला नाही मतदानाला जायचं! मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर