पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईकर मराठी माणसाचा विश्वास शिवसेनेवर, निवडणुकीतून स्पष्ट

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून अनेक मुद्दे आता स्पष्ट होऊ लागले आहेत. मुंबईमधील मराठी माणसाचा विश्वास फक्त शिवसेनेवरच असल्याचे या निकालांवरून दिसते. मुंबईतील विविध मतदारसंघातील मतदानाच्या पद्धतीचे विश्लेषण केल्यावर हा मुद्दा प्रकर्षाने स्पष्ट होतो. अनेक विश्लेषकांनी म्हटले आहे की मुंबईतील मतदारांचा आता काँग्रेस आणि भाजप या पक्षांवर विश्वास राहिलेला नाही. हे पक्ष अमराठी मतदारांनाही आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करताहेत. त्यामुळे मराठी माणसांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरही मराठी माणसाचा पुरेसा विश्वास नाही, असेही दिसून आले आहे.

आमचं काय चुकलं? : चंद्रकांत पाटील

मुंबईमध्ये शिवसेनेने जिंकलेल्या १४ जागांपैकी भांडूप, विक्रोळी, मागाठाणे, जोगेश्वरी, दिंडोशी, शिवडी, वरळी, माहिम या मतदारसंघांमध्ये मराठी टक्का जास्त आहे. या सर्व मतदारसंघांमधून शिवसेनेचे उमेदवार २० ते ६७ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. शिवडीमध्ये शिवसेनेचे उमेदवार अजय चौधरी ३९३३० च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. वरळीमधून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ६७४२७ च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. माहिममधून शिवसेनेचे सदा सरवणकर १८६४७ च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. दिंडोशीमधून सुनील प्रभू ४४५११ च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. जोगेश्वरी पूर्वमधून रविंद्र वायकर ५८७८७ च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. भांडूपमधून शिवसेनेचेच रमेश कोरगावकर २९१७३ च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. 

या सर्व मतदारसंघांमध्ये मनसेनेही आपले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे मराठी मतदारांपुढे दोन पर्याय होते. पण त्यांनी मनसेऐवजी शिवसेनेलाच आपली पसंती दिली. राजकीय विश्लेषक दीपक पवार म्हणाले, मराठी माणूस शिवसेनेलाच मत देतात हे यंदाच्या निकालातून दिसून आले आहे. शिवसेनेने आता भूमिपुत्रांपेक्षा हिंदुत्वाचा विषय घेऊन पुढे जायचे ठरविले आहे. तरीही मराठी माणसाचा शिवसेनेवरच विश्वास असून तो याच पक्षाच्या बाजूने आपला कौल देतो. 

मोदींच्या सौदी दौऱ्यासाठी हवाई हद्द खुली करण्यास पाकचा नकार

याच मुद्द्याचे सविस्तर विश्लेषण करताना दीपक पवार म्हणतात, लोकांपुढे दुसरा कोणता पर्यायही नाही. हे सुद्धा त्यांचे शिवसेनेच्या मागे जाण्याचे आणखी एक कारण आहे. मुंबईतील मराठी माणूस भाजपकडे आपला पक्ष म्हणून पाहात नाही. कारण पारंपरिकपणे हा पक्ष गुजराती समाजाचा म्हणून ओळखला जातो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना मुंबईमध्ये जनाधारच नाही, असेही त्यांनी सांगितले.