पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी सरकारने बोलणं व डोलण्यापेक्षा काम करावं: शिवसेना

पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिवसेनेने सीएए आणि कलम ३७० वरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. सरकारने काम करावे. बोलणे व डोलणे कमी करावे. दिल्लीच्या निवडणुकीत हा प्रकार चालला नाही, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. वाराणसी येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी मोठा दबाव असला तरी सीएएसारख्या निर्णयावर सरकार ठाम असल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या वक्तव्याचा हवाला देत मोदी सरकारवर सेनेने टीका केली. राष्ट्रहिताचे निर्णय सरकार घेते ही मेहेरबानी नाही, पण एखाद्या विषयावर असहमती व्यक्त करणे म्हणजे देशद्रोह नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते, असे सांगत राष्ट्रहिताचे निर्णय मागे घेणार नाही आणि त्यासाठी दबाव आले तरी झुकणार नाही, अशी भाषा निदान सरकारने करू नये. त्यामुळे टाळ्या मिळतात, पण मते दुसरीकडे वळतात हे दिल्लीत दिसले, अशी उपरोधिक टीका शिवसेनेने केली.

बहावलपूर येथील बॉम्ब प्रूफ घरात लपून बसला आहे 'बेपत्ता' मसूद अझहर

शिवसेनेने 'सामना' या आपल्या मुखपत्रातून सरकारच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर बोट ठेवले. ३७० कलमाचा निर्णय किंवा सीएए रद्द करा असा दबाव पंतप्रधानांवर कोण आणत आहे ते त्यांनी स्पष्ट करायला हवे. भाजपने याप्रश्नी धुरळा उडवू नये. कश्मीरातून ३७० कलम हटवले हा निर्णय देशहिताचाच आहे. त्याबाबत दुमत नाही. अपवाद वगळता विरोधी पक्षानेही ३७० हटवल्याबद्दल सरकारचे समर्थन केले आहे. ३७० कलम काढून जम्मू-कश्मीरचा भाग पुन्हा भारताला जोडला असे सांगण्यात आले. ते चुकीचे आहे. भारतीय सैनिकांच्या शौर्यामुळे हा भाग सदैव भारताचाच होता व राहिला. हे सध्याचे सरकारही मान्य केल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न इतकाच आहे की, कश्मीरातून ३७० कलम हटवल्यावर तेथे जगावेगळे काय घडले आहे? हजारो कश्मिरी पंडित जे आजही आपल्याच देशात निर्वासितांचे जीवन जगत आहेत त्यापैकी किती पंडितांची घरवापसी झाली, त्याचा हिशेब मागितला तर पंतप्रधान जोरात सांगतात, ‘‘काही झाले तरी ३७० कलमाचा निर्णय फिरवणार नाही!’’ आम्ही सांगतो निर्णय नका फिरवू, पण निदान शब्द तरी फिरवू नका. 

हिंजवडीतील व्हेरॉक कंपनीला भीषण आग

काश्मीरात नवे उद्योग आणू असा शब्द होता. तोसुद्धा अधांतरीच आहे. हे झाले ३७० कलमाचे. आता राहिला विषय ‘सीएए’चा. या कायद्याबाबत लोकांच्या मनात कसली शंका आणि भय आहे ते दूर केले की प्रश्नच संपतो. मोदी व शहा हे राज्यकर्ते आहेत व त्यांचे निर्णय देशहिताचेच असतात. त्यावर कोणी शंका घेतली आहे काय? भारतातून परकीय नागरिकांना बाहेर काढायला हवे. बांगलादेशी किंवा पाकिस्तानी घुसखोरांना लाथा घालून बाहेर काढले पाहिजे यावर संपूर्ण देशाचे एकमत आहे व असा निर्णय घेतला हे सरकारचे कर्तव्यच आहे. आता तुम्ही त्या कर्तव्याची पूर्तता करा इतकेच सांगणे आहे. या विषयावर प्रचारकी भाषणे जास्त व कृती कमी असेच घडताना दिसत आहे.

कोरोनाची दहशत, मृतांचा आकडा १८०० वर