पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

झारखंडच्या जनेतेने आर्थिक दहशतवाद झुगारला, शिवसेनेची भाजपवर टीका

उद्धव ठाकरे आणि अमित शहा

झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. ही संधी साधून एकेकाळचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेने भाजपला फटकारले आहे. झारखंडच्या श्रमिक, आदिवासी जनतेने भूलथापा व आमिषांना बळी पडण्याचे नाकारले हे सत्य स्वीकारावे लागेल. लोकांनी ठरवले की ते सत्ता, दबाव व आर्थिक दहशतवादाची पर्वा करीत नाहीत. हवा तो बदल घडवून आणतात, असा टोला शिवसेनेने लगावला. नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे भाजपच्या हिंदू मतदानाचा टक्का वाढेल अशी त्यांची धारणा होती, ती सपशेल अपयशी ठरल्याचे सेनेने म्हटले आहे.

दि. ३० डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, अजित पवारांचेही कमबॅक?

शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रातील सत्ता गेली. झारखंडमध्येही तेच घडले. भाजप एकापाठोपाठ एक राज्य गमावत आहे. आता झारखंडही गमावले. हे असे का? याचा विचार करतील अशी त्यांची मानसिकता नाही. जनतेला गृहीत धरले की, वेगळे काय घडणार, असा उलट सवाल शिवसेनेने केला. 

काय म्हटलंय शिवसेनेने..
पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ राबवूनही झारखंड भाजपला राखता आले नाही. झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री होतील. काँग्रेस-राजदच्या पाठिंब्यावर झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार तेथे येत आहे. हे भाजपसाठी धक्कादायक आहे. काँग्रेसमुक्त भारताची घोषणा भाजपचे नेते करीत होते, पण अनेक राज्येच भाजपमुक्त झाली. मध्य प्रदेश, राजस्थान ही मोठी राज्ये भाजपने आधीच गमावली.

राहुल गांधींचा PM मोदींसह शहा अन् RSS वर घणाघात

एक महिन्यांपूर्वी हरयाणामध्ये विधानसभा निवडणूक झाली. तेथेही काँग्रेसने मुसंडी मारली. भाजपची सत्ता तेथूनही जवळ जवळ गेलीच होती, पण ज्या दुष्यंत सिंह यांच्या विरोधात निवडणूक लढवली, त्याच दुष्यंत यांचा टेकू घेत, त्यांना उपमुख्यमंत्रीपद देत भाजपने कशीबशी सत्ता राखली. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार शिवसेनेच्या नेतृत्वाखाली विराजमान झाले. २०१८ मध्ये भाजप सुमारे ७५ टक्के प्रदेशांत सत्ता ठेवून होती. आता घसरगुंडी झाली आहे. 

त्रिपुरा, मिझोराममध्येही भाजपने सत्ता पटकावली. पण आज त्रिपुरात निवडणुका घेतल्या तर तेथील जनता भाजपची सत्ता उलथवून लावील अशी स्थिती आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या संदर्भात सगळय़ात जास्त त्रिपुरात हिंसाचार झाला व तो रोखण्यात भाजप सरकार अपयशी ठरले. हे संपूर्ण देशातच घडताना दिसत आहे.

पाक गोलंदाज अन् भारतीय सुरक्षा रक्षकाचा हा व्हिडिओ होतोय

गृहमंत्री अमित शहा यांची झारखंडच्या प्रचार सभेतील भाषणे तपासली तर तेथे सरळ हिंदू-मुसलमान असा भेद करायचा प्रयत्न होता हे स्पष्टपणे दिसते. खासकरून नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे भाजपच्या हिंदू मतदानाचा टक्का वाढेल अशी त्यांची धारणा होती, पण झारखंडच्या श्रमिक, आदिवासी जनतेने भूलथापा व आमिषांना बळी पडण्याचे नाकारले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:shiv sena slams on bjp pm modi and amit shah on jharkhand assembly result 2019 uddhav thackeray