अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प येत्या २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादेतील झोपड्या लपवण्यासाठी भिंती बांधल्या जात आहेत. या मुद्द्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
लष्करात महिलांना पर्मनंट कमिशन द्या,सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले
मोदी १५ वर्ष गुजरात राज्याचे 'बडा प्रधान' आणि आता ५ वर्ष संपूर्ण देशाचे 'बडा प्रधान' असतानाही गुजरातची गरिबी आणि बकालपणा लपवण्यासाठी भिंती उभारण्याची नामुष्की का यावी? असा खोचक सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. तसंच, ट्रम्प यांचा अहमदाबाद दौरा आटोपल्यानंतर झोपडपट्ट्या लपविणाऱ्या भिंती पाडणार काय? असा सवाल देखील सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
... अखेर एअरटेलने १०००० कोटी सरकारकडे जमा केले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे 'बादशहा' येत्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे आपल्या देशात मोठीच लगीनघाई सुरु आहे. ट्रम्प काय खातात, काय पितात, त्यांच्या गाद्या-गिरद्या, टेबल, खुर्च्या, त्यांचे बाथरुम, त्यांचे पलंग, छताची झुंबरे कशी असावीत यावर केंद्र सरकार बैठका, सल्लामसलती करीत असल्याचे दिसते. गुलाम हिंदुस्थानात इंग्लंडचा राजा किंवा राणी येत असत तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी असी लगीनघाई हेत असे आणि जनतेच्या तिडोरीतून मोठा खर्च केला जात असे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
क्षेपणास्त्रासाठीचे उपकरण घेऊन पाककडे निघालेले जहाज
ट्रम्प यांना मोदी-शहांच्या गुजरातमध्ये आधी का नेले जात आहे या प्रश्नाचे खरे उत्तर मिळणे कठीण आहे. मोदी यांनी ट्रम्प यांना आधी गुजरातमध्ये नेण्याचे ठरवले व त्यांच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. ट्रम्प अहमदाबाद विमानतळावर उतरतील. त्यामुळे विमानतळ, विमानतळाबाहेरचे रस्ते यांची ‘मरम्मत’ सुरू आहे. ही ‘मरम्मत’ करण्यासाठी ट्रम्प यांचे पाय अहमदाबादला लागणे हे ऐतिहासिकच म्हणायला हवे, असेही सामनामध्ये म्हटले आहे.
महिलेच्या प्रायव्हेट पार्ट्सला स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला मुंबईत अटक
ट्रम्प हे फक्त तीन तासांच्या भेटीवर येत आहेत व त्यासाठी शंभर कोटींवर खर्च सरकारी तिजोरीतून होत आहे. १७ रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहे, नवे रस्ते बांधले जात आहेत, पण सगळ्यात गंमत अशी की, ट्रम्प यांना अहमदाबादच्या रस्त्यांच्या कडेला असलेल्या बकाल गरीबांच्या झोपड्यांचे दर्शन होऊ नये म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला ‘गडकोट’ किल्ल्यास तटबंदी असावी तशा भिंती उभारण्याचे काम सुरू आहे. ट्रम्प यांच्या नजरेतून गुजरातची गरिबी, झोपड्या सुटाव्यात यासाठी ही 'राष्ट्रीय योजना' हाती घेतल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे.