पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली जळत असताना गृहमंत्री कुठे होते?; शिवसेनेचा सवाल

अमित शहा

दिल्ली हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. 'दिल्ली जळत असताना, आक्रोश करत असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते? काय करीत होते?, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. 

भाजप नेते नरेंद्र मोहतांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

दिल्लीच्या दंगलीत आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्रात काँग्रेस अथवा अन्य आघाडीचे सरकार असते आणि विरोधी बाकांवर भाजपचे महामंडळ असते. तर दंगलीबद्दल गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. 

गुप्तचर अधिकाऱ्याची हत्या चाकूने भोकसून; शवविच्छेदन अहवालात

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत मोर्चे निघाले असते. राष्ट्रपती भवनावर धडक दिली असती. गृहमंत्री अपयशी ठरल्याचे खापर फोडून राजीनामा हवाच असा आग्रह धरला असता पण आता तसे होणार नाही. कारण केंद्रात भाजपची सत्ता आहे. विरोधी पक्ष कमजोर आहे. तरीही सोनिया गांधी यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला, असे सामनात म्हटले आहे.

काही मिनिटांत बुडाले ५ लाख कोटी

दरम्यान, राजधानीत ३८ बळी गेले. त्यात पोलिसही आहेत. केंद्राचे अर्धे मंत्रिमंडळ त्यावेळी अहमदाबादमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना 'नमस्ते, नमस्ते साहेब!' असे करण्यासाठी गेले होते. केंद्रीय गृहमंत्री आणि त्यांचे सहकारी देखील अहमदाबादमध्ये होते. त्यावेळी गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या झाली, असे सामनामध्ये म्हटले आहे.  

कोरोनाचा कहर, शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स ११०७ अंकानी कोसळला

तब्बल तीन दिवसानंतर मोदींनी शांतता राखण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल चौथ्या दिवशी त्यांच्या सहकाऱ्यांसह दिल्लीच्या रस्त्यावर लोकांशी संवाद साधताना दिसले. त्याने काय होणार? जे व्हायचे ते नुकसान आधीच झाले. प्रश्न आता आहे की याकाळात आपल्या गृहमंत्र्यांचे दर्शन का झाले नाही? देशाला मजबूत गृहमंत्री लाभले आहेत पण ते दिसले नाही याचे आश्चर्य वाटते, अशी टीका करण्यात आली आहे. 

हिंसाचारानंतर एका भागातूनच गोळा केले २ हजार किलो विटांचे तुकडे