पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी कर्तबगार पण उत्साही भक्तांमुळे अडचणीत,सेनेची स्तुतीसुमने

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भाजप नेते जय भगवान गोयल लिखित वादग्रस्त 'आज के शिवाजीः नरेंद्र मोदी' हे पुस्तक अखेर मागे घेण्यात आले आहे. लेखक गोयल यांनी याप्रकरणी माफी मागितल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केले आहे. परंतु, भाजपवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेने या संधीचाही लाभ घेतला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले आहे. आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक म्हणजे चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. भाजपवाले आता गोयलशी आमचा संबंध नसल्याचे म्हटले आहे. पण पक्ष कार्यालयात पुस्तक प्रसिद्ध झाले त्यावेळी भाजपचे नेतेही त्यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी यावर बोलावे. शिवाजी महाराज यांची तुलना मोदी यांच्याशी करण्यात आल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. हा राग मोदी यांच्या विरोधात नाही. मोदी यांच्या पाठीमागे हे सर्व उद्योग सुरू आहेत. मोदी हे कर्तबगार आणि लोकप्रिय नेते आहेत, देशाचे पंतप्रधान म्हणून आज त्यांना तोड नाही, पण तरीही ते देशाचे छत्रपती शिवाजी आहेत काय? त्यांना छत्रपती शिवरायांचे स्थान देणे योग्य आहे काय? याचे उत्तर एका सुरात नाही!’ असेच आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. 

हीच ती वेळ!, शिवसेनेच्या हँडलवरील ते टि्वट तेवढं अनपिन करा

'सामना' या आपल्या मुखपत्रात त्यांनी भाजप नेत्यांवर टीका करताना पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने उधळली. शिवसेनेने पुढे म्हटले की, पंतप्रधान मोदी यांनाही ही तुलना आवडली नसेल, पण फाजील उत्साही भक्त आपल्या नेत्यांना अडचणीत आणतात तसे आता झाले आहे. आता ज्यांनी मोदी यांना ‘आज के शिवाजी’ संबोधिले त्याच लोकांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी यांना विष्णूचे तेरावे अवतार अशी मान्यता दिली. काल विष्णूचे अवतार, आज ‘शिवाजी.’ यात देश, देव, धर्माचाही अपमान आहेच, पण मोदी यांचीही कोंडी होत आहे. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक म्हणजे ढोंग व चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना आहे. 

गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्यास नकारात्मकता दूर होतेः यशोमती ठाकूर

महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी या ढोंगी प्रकाराचा खुल्या दिलाने निषेध केला पाहिजे. दिल्लीतील काही नेत्यांनी वीर सावरकरांचे चरित्र वाचावे व दिल्लीतील भाजप पुढाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यावेत. म्हणजे त्यांचे गैरसमज दूर होतील. महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचे सर्व गाद्यांचे वारसदार आज भाजपमध्ये आहेत. प्रत्येक गादीबद्दल आम्हाला आदर आहे. महाराष्ट्र संतापला असताना शिवरायांच्या वारसदारांनाही आता ठोस भूमिका घ्यावी लागेल. छत्रपतींनी मोगलांच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून ‘स्वराज्य’ स्थापन झाले. त्यांनी चाकरीचा मार्ग स्वीकारला असता तर महाराष्ट्र निर्माण झाला नसता. शिवरायांनी दिल्लीश्वरांच्या मनसबदारीवर लाथ मारली म्हणून ‘मराठी बाणा’ आजही जागा आहे. शिवराय शूर होते व संयमी होते म्हणून त्यांनी स्वराज्य निर्माण केले.

वादग्रस्त पुस्तक मागे, लेखकाने माफीही मागितलीः प्रकाश जावडेकर