पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सावरकर देशाचे दैवत, अपमान सहन करणार नाही; सेनेने काँग्रेसला सुनावलं

संजय राऊत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत बचाओ रॅलीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे. भाजपने तर राहुल गांधी यांना जिना हे आडनाव उपयुक्त असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, राज्यात काँग्रेसच्या साथीने सरकार स्थापन केलेल्या शिवसेनेही राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून सावरकरांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नसल्याचे शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले आहे. 

'राहुल यांच्यासाठी 'जिना' हेच आडनाव उपयुक्त', भाजप आक्रमक

सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. त्यांच्या नावातच राष्ट्राभिमान आहे. नेहरु, गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा, इथे तडजोड नाही, अशा शब्दांत त्यांना काँग्रेसला फटकारले आहे. 

शिवसेनेने मूळ बाणा दाखवावा, भीतीची गरज नाहीः आशिष शेलार

आम्ही पंडित नेहरु, महात्मा गांधी यांना मानतो. तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करु नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

दरम्यान, राहुला गांधी यांनी मेक इन इंडिया नव्हे तर रेप इन इंडिया असा उल्लेख केला होता. त्यावर भाजपने त्यांच्या माफीची मागणी केली होती. त्यावर शनिवारी भारत बचाओ रॅलीत त्यांनी सावरकर यांचा उल्लेख केला होता. 'मी मरण पत्करेल पण माफी मागणार नाही. सत्य बोललो म्हणून मला माफी मागायला सांगितली जात आहे. मी काहीही चुकीचे बोललेलो नाही. त्यामुळे मी घाबरणार नाही. माझे नाव राहुल सावरकर नाही. मी राहुल गांधी आहे. सत्य बोलण्यासाठी मी माफी मागणार नाही.', असे त्यांनी म्हटले होते.

मी मरण पत्करेल पण माफी मागणार नाही: राहुल गांधी