पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वायफळ बोलण्यापेक्षा मौनात ताकद, संजय राऊत यांचे मोदींना समर्थन

संजय राऊत, नरेंद्र मोदी

पाच वर्षांत पहिल्यांदा पत्रकार परिषद घेऊनही पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे न दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशभरातून टीका होताना दिसत आहे. परंतु, भाजपाबरोबर सत्तेत भागीदार असूनही एकेकाळी मोदींवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेने मात्र चक्क स्तुतीसुमने उधळली आहेत. शिवसेनेचे नेते, राज्यसभेचे सदस्य संजय राऊत यांनी मोदींचे मोठे कौतुक केले आहे. मौन स्फोटक असते. वायफळ बोलण्यापेक्षा मौनात ताकद असते, असे म्हणत मोदींनी मौन साधूनच सर्वांना उत्तरे दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

'मौन की बात'वर राज ठाकरेंचं मोदींना आव्हान

'एबीपी माझा'शी ते बोलत होते. मोदींना जे काही सांगायचे आहे, ते त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून अनेक माध्यमातून सांगितले आहे. मौन स्फोटक असते. मोदींनी मौन साधूनच आतापर्यंत उत्तरे दिली आहेत, असे ते यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदींच्या पत्रकार परिषदेवर टीका केली होती. जर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनाच बोलायचे होते तर पंतप्रधान मोदी पत्रकार परिषदेत कशाला आले? असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत केला. आपल्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी मोदींनी उपस्थिती लावलेल्या पत्रकार परिषदेवर टिप्पणी केली होती. "पंतप्रधानांची पत्रकार परिषद... ‘मौन की बात’" अशा शब्दात त्यांनी मोदींवर खोचक टीका केली होती.

मोदींच्या शौर्याची दखल गिनीज बुकने घ्यावी, धनंजय मुंडेंचा टोला

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:shiv sena mp sanjay raut praises pm modis silence in press conference loksabha election 2019