पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेकडे गृह, नगर विकास; राष्ट्रवादीकडे अर्थ, गृहनिर्माण, घोषणा लवकरच

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार येऊन जवळपास १५ दिवस झाले तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही आणि मंत्र्यांचे खातेवाटपही जाहीर झालेले नाही. पण लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, मंत्र्यांचे खातेवाटपही जवळपास निश्चित झाले आहे. या तिन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक मंगळवारी रात्री मुंबईत झाली. त्यामध्ये खातेवाटप निश्चित झाले असल्याचे समजते.

माजी CM फडणवीसांना शिवसेनेकडून ही अपेक्षा

खातेवाटपामध्ये शिवसेनेला गृह आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती मिळणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ, गृहनिर्माण ही महत्त्वाची खाती जाणार आहेत. सत्तेतील तिसरा मित्रपक्ष काँग्रेसला महसूल, उद्योग ही खाती मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही. पण या पद्धतीनेच खातेवाटप होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून उपमुख्यमंत्री कोण होणार यावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. विशेषतः अजित पवार यांनी गेल्या महिन्यात बंड करून थेट भाजपसोबत तीन दिवसांचे सरकार स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादीमध्येही अस्वस्थता आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर झाल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात काँग्रेसच्या एका नेत्याने हिंदुस्थान टाइम्सला सांगितले की, खातेवाटप हे जवळपास निश्चित झाले असून, बुधवारी याची अधिकृत घोषणा होईल. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर नव्या मंत्र्यांना त्यांची खाती दिली जातील. संबंधित पक्षाला जी खाती देण्यात आली आहेत त्यातूनच मंत्र्यांना खाते वाटून दिले जाईल.

अमेरिकेतील न्यू जर्सीत गोळीबार; पोलिस अधिकाऱ्यासह ६ जण ठार

२८ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात त्यांच्या सरकारने ३० नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणीही जिंकली होती. १६९ आमदारांचा या सरकारला पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले होते.