पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फडणवीसांना सत्तेसाठी अति घाई आणि फाजील आत्मविश्वास नडलाः संजय राऊत

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या समान वाटपावरुन भाजपशी काडीमोड झाल्यापासून शिवसेना नेते संजय राऊत टीका करत आहेत. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून 'रोखठोक' स्तंभात देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती हल्ला केला आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त आत्मविश्वास आणि दिल्लीवर जास्त अवलंबून राहिल्यामुळे फडणवीस यांचे राजकारण संपुष्टात आले, असा आरोप राऊत यांनी केला. 

राऊत यांनी म्हटले की, अति-आत्मविश्वास आणि दिल्लीतील नेत्यांवर अवलंबून राहण्यामुळे त्यांचे राजकारण उद्धवस्त झाले. मागील दोन महिन्यातील हालचाली या 'सिंहासन' चित्रपटाच्या पटकथेसारखी वाटते. 

मी येथे येईन असं कधीच म्हणालो नाही, तरीही मी आलो; CM ठाकरेंचा टोला

आपल्या बालिश वक्तव्यांमुळे ते स्वतः विरोधी पक्षनेते बनले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी फडणवीस यांनी राज्यात कोणताच विरोधी पक्ष राहणार नाही, शरद पवार यांचा काळ संपला, असे म्हटले होते. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी प्रमुख विरोधी पक्ष असेल असा दावाही केला होता. आज ते स्वतः विरोधात बसले आहेत.

अजित पवार यांच्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणखी जवळ आले आणि त्यांनी आघाडी केली. त्यामुळे बंडखोरी करु पाहणाऱ्या आमदारांवर दबाव आला. त्यामुळे अजित पवार यांनाही शरद पवार यांच्याकडे परतावे लागले.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर टीका करताना ते म्हणाले की, महाराष्ट्र, दिल्लीप्रमाणे सुरु असलेल्या राजकारणापुढे झुकला नाही. महत्त्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मोदी-शहांचा दबदबा संपवून सत्तेवर आले. उद्धव सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही व्यक्त केला.

'पुढे काय करायचं, थोडा वेळ द्या'; पंकजा मुंडे मोठा निर्णय घेणार ?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला. राज्यपाल कार्यालयाने फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या ८० तासांच्या सरकारमध्ये खलनायकाची भूमिका निभावली असल्याचा आरोप केला. 

'राधाकृष्ण विखे-पाटील आमचेच आहेत, आम्ही त्यांना ओढून आणू'