पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'सावरकरांना 'भारतरत्न' देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानच्या तुरुंगात पाठवा'

संजय राऊत

काँग्रेस सेवादलाच्या 'वीर सावरकर कितने वीर' या पुस्तकात सावरकरांबद्दल केलेल्या दाव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. तसंच वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यास विरोध करणाऱ्यांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी असे सांगितले आहे की, 'जे लोकं वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यास विरोध करत आहेत. त्यांना दोन दिवसांसाठी अंदमानच्या तुरुंगामध्ये पाठवा. तेव्हा त्यांना सावरकर काय आहेत हे माहिती पडेल.', असे त्यांनी म्हटले आहे.

निर्भया प्रकरण:दोषींना माफ करा,इंदिरा जयसिंहांचे आवाहन;आशादेवी भडकल्या

माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी वीर सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 'जी लोकं वीर सावरकरांचा विरोध करतात, ते कोणत्याही विचारधारा किंवा पक्षाचे असू द्या. त्यांना अंदमान तुरुंगातील काळ कोठडीमध्ये फक्त दोन दिवसांसाठी पाठवा. ज्या ठिकाणी वीर सावरकरांना ठेवण्यात आले होते. तेव्हा त्यांना सावरकरांनी देशासाठी दिलेले बलिदान आणि त्यांच्या योगदानाची जाणीव होईल.' असे संजय राऊत यांनी सांगितले. 

दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'कृष्णकुंज'वर

दरम्यान, याआधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी असे म्हटले होते की,'माझे नाव राहुल सावरकर नाही आहे'. त्यावेळी संजय राऊत यांनी असे म्हटले होते की, हिंदुत्ववादी विचारवंताच्या श्रध्देवरुन कोणतीही तडजोड करता येणार नाही. राऊत यांनी पुढे असे सांगितले होते की, 'आम्ही महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंचा आदर करतो. कृपया वीर सावरकरांचा अपमान करू नका. जो समजुतदार आहे त्याला जास्त काही सांगण्याची गरज नाही.', असे त्यांनी म्हटले होते. 

केरळने राहुल गांधींना निवडून विनाशकारी काम केलंयः रामचंद्र गुहा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:shiv sena leader sanjay raut says those who oppose veer savarkar let them stay in andaman cellular jail