पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'फडणवीसांच्या कोणत्याही वक्तव्याकडे आम्ही गांभिर्याने पाहत नाही'

संजय राऊत (ANI)

शिवसेनेने साद द्यावी भाजपची दारे त्यांच्यासाठी उघडी आहेत असे वक्तव्य करणाऱ्या फडणवीसांना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. 'आता कुणीही कुठलाही दरवाजा उघडा ठेवू नका, जेव्हा उघडायचे होते तेव्हा उघडले नाही. ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्या मान्य केल्या नाहीत. आता चर्चेची वेळ निघून गेली, असल्याचे संजय राऊत यांनी केले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, देवेंद्र फडणवीसांच्या कोणत्याही वक्तव्याकडे आम्ही गांभिर्याने पाहत नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. 

उस्मानाबादमध्ये वाळू माफियांचा तहसीलदारावर जीवघेणा हल्ला

शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा, फोटोचा वापर प्रचारात केला असल्याची टीका फडणवीस यांनी केली होती. याला देखील संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. 'मोदींचे फोटो लावणे गुन्हा नाही. आम्ही तेव्हा युतीत होतो. भाजप महाराष्ट्रात बाळासाहेबांचे फोटो लावून वाढला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसंच, भाजपने आमचे उमदेवार पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जर आम्ही स्वतंत्रपणे लढलो असतो तर १०० च्या आसपास जागा जिंकलो असतो, असा दावा त्यांनी केला आहे. 

दिल्लीमध्ये आज काँग्रेसची 'भारत बचाओ रॅली'; मोदी सरकारला

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार ऑटोरिक्षाच्या तीन चाकांसारखे असल्याची टीका केली होती. फडणवीसांच्या वक्तव्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी सांगितले की, 'ऑटोरिक्षा किंवा बैलगाडीचे सरकार असू द्या ते चालले आहे. विरोधी पक्षाच्या वक्तव्यामुळे सरकारला प्रेरणा मिळते. आमचे सरकार फार वेगाने जाणार नाही असे देखील आरोप ते करतात. पण आम्ही कासवाच्या गतीने जाऊ पण टप्पा पार करु, असे संजय राऊत यांनी सांगितले.

पालघर ४.८ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याने हादरले