राज्यातील सत्तास्थापनेच्या तिढ्यात शिवसेनेची भूमिका भक्कमपणे मांडणारे खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयत दाखल झाल्याचे वृत्त आहे. छातीत दुखत असल्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉ.जलील पारकर त्यांच्यावर उपचार करणार असून त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार असल्याचे समजते.
: राजकीय घडामोडींसदर्भातील अपडेट्स
डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतर नियोजित वेळेनुसार ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. लिलावती रुग्णालयातील ११ व्या मजल्यावरील वार्ड त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत.
अशा वातावरणात दिल्लीत राहू शकत नाहीः अरविंद सावंत
गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रकृती अस्वस्थतेचा त्रास जाणवत होता. त्यामुळे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर उद्या त्यांना घरी सोडण्यात येईल, अशी माहिती संजय राऊत यांचे भाऊ आणि शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.