पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी

किशोरी पेडणेकर (Twitter)

शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा कार्यकाळ २१ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. नूतन महापौरपदाची निवड २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. किशोरी पेडणेकर या शिवसेनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आहेत.

लोक येतील अन् जातील, पण ही व्यवस्था चालतच राहील : मोदी

शिवसेनेकडून यशवंत जाधव आणि किशोरी पेडणेकर यांच्या नावाची महापौरपदासाठी चर्चा होती. परंतु, यात किशोरी पेडणेकर यांनी बाजी मारली. सोमवारी दुपारी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. उपमहापौरपदासाठी सुहास वाडकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. 

मुंबई महापालिकेत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष आहे. शिवसेनेचे ९४ नगरसेवक, भाजपचे ८३, काँग्रेस २९, राष्ट्रवादी काँग्रेस ८, समाजवादी पार्टी ६, मनसे १ आणि एमआयएमचे २ नगरसेवक असे संख्याबळ आहे. महापौरपदाची निवडणूक ही हात उंचावून केली जाणार आहे.

राष्ट्रवादीकडून थोडं शिका, मोदींनी राज्यसभेत केलं कौतुक

मुंबई महापालिकेची सदस्य संख्या ही २२७ इतकी आहे. बहुमतासाठी ११४ सदस्य हवे आहेत. २०१७ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेला भाजपने बाहेरुन पाठिंबा दिला होता. त्यामुळे महापौरपद शिवसेनेकडे राहिले होते. यावेळी शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देण्याची शक्यता आहे. या तिनही पक्षांच्या सदस्यांची संख्या ही १३० पर्यंत जाते.