पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NDA च्या बैठकीला उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेही लावणार हजेरी

उद्धव ठाकरे

लोकसभेच्या निकालापूर्वी दिल्लीमध्ये भाजपकडून आयोजित केलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हजेरी लावणार आहेत. आज (मंगळवार) दिल्ली येथे भाजपने आपल्या घटक पक्षांची एक खास बैठक बोलवली आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप अध्यक्ष अमित शहा देखील उपस्थित राहणार आहेत.

NDA ची मोठी बैठक, दिग्गज नेते सहभागी होणार

मतदानानंतर उद्धव ठाकरे कुटुंबियांसह परदेशी गेले होते. त्यामुळे दिल्ली येथील एनडीएच्या बैठकीला शिवसेनेकडून कोण जाणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. उद्धव ठाकरे आजच परदेशातून मुंबईत आले. त्यांनी दुपारी पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या विवाह सोहळ्यात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दिल्लीला रवाना होणार आहेत. सुभाष देसाई देखील त्यांच्यासोबत दिल्लीला जाणार आहेत, असे वृत्त एबीपी माझा वृत्त वाहिनीने दिले आहे.

विविध एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात शिवसेना-भाजप यांना समान जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवसेना हा भाजपचा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे या बैठकीत शिवसेना काही विशेष मागणी मित्र पक्ष आणि भाजपा अध्यक्षांसमोर ठेवणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.  

दिल्लीत राजकीय हालचालींना वेग, सर्व विरोधकांची एकत्रित बैठक

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Shiv Sena Chief Uddhav Thackeray to attend dinner hosted by Amit Shah for NDA leaders today