पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; ठाकरे-पवार यांच्यात एकतास चर्चा

शरद पवार आणि उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा पेच लवकरच सुटणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. त्यासाठी दिल्लीमध्ये गेल्या दोन दिवस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकांवर बैठका झाल्या. त्यानंतर आता शुक्रवारी मुंबईमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी रात्री उशिरा भेट घेतली. तब्बल एकतास दोघांमध्ये चर्चा झाली.

 

सत्ता स्थापनेमध्ये काँग्रेसला 'न्याय' मिळणार का?

दिल्लीतील आघाडीच्या बैठका संपल्यानंतर शरद पवार रात्री दिल्लीवरुन मुंबईमध्ये दाखल झाले. त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन पवारांची भेट घेतली. रात्री ११.२० वाजता उद्धव ठाकरे पवारांच्या भेटीसाठी पोहचले. त्यानंतर दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली. १२.१५ वाजता त्यांची बैठक संपली. या बैठकी दरम्यान, सुप्रिया सुळे आणि अजित पवार देखील उपस्थित होते. 

'आमचं ठरलंय! सेनेसोबतच्या चर्चेनंतर अधिकृत घोषणा करायची'

सत्तास्थापनेसाठी हालचालिंना वेग आला आहे. शुक्रवारी मुंबईत आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर शिवसेनेसोबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटी दरम्यान नेमकं काय झाले हे समोर आले नाही. मात्र बैठकीनंतर संजय राऊत यांनी थम्प्स अप दाखवत बैठक सकारात्मक झाल्याचे संकेत दिले. 

INDvWI: विडींज विरुद्धच्या टी-२० साठी टीम इंडियाची घोषणा