पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेतकऱ्यांच्या अजेंड्यावर शिवसेना- राष्ट्रवादी एकत्र काम करणार

शरद पवार आणि उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

राज्यामध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये दुपारी बैठक झाली. वांद्रे पश्चिम येथील 'ताज लॅण्ड्स एण्ड' या हॉटेलमध्ये तब्बल पाऊण तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकी दरम्यान युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे-पाटील देखील उपस्थित होते. या बैठकी दरम्यान शिवसेनेने राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. 

अशा वातावरणात दिल्लीत राहू शकत नाहीः अरविंद सावंत

या बैठकीमध्ये उद्घव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये महत्वपूर्ण चर्चा झाली. राज्यात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या अजेंड्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र काम करणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत झाला आहे. 

दुपारी ४ नंतर काँग्रेसचा अंतिम निर्णयः मल्लिकार्जुन खर्गे

दरम्यान, शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे संख्याबळ वाढवण्यासाठी आणि पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेनकडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या राज्यात आणि दिल्लीमध्ये सत्तास्थापनेबाबत बैठका सुरु आहे. 

काँग्रेसचे ठरल्यावरच आमचाही निर्णय - राष्ट्रवादी काँग्रेस