मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या कारला अपघात झाल्याची घटना शनिवारी घडली. राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरेंची बहिण हे सहकुटुंब एकवीरा देवीच्या दर्शनाला गेले होते.
मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज वैध! विरोधकांच्या पदरी निराशा
देवीचे दर्शन घेऊन मुंबईत परतत असताना नवी मुंबईतील सानपाडा सिग्नल जवळ शर्मिला ठाकरे यांच्या कारला अपघात आहे. याच कारमध्ये राज ठाकरे यांच्या बहिण देखील होत्या. शर्मिला ठाकरे यांना मुका मार लागला असून चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
उद्धव ठाकरे नव्हे 'यू-टर्न' ठाकरे म्हणा, धनंजय मुंडेंचा टोला
अचानक रिक्षा आडवी आल्याने चालकाने ब्रेक मारला. त्यावेळी पाठीमागून आलेल्या कारने शर्मिला ठाकरे यांच्या कारला धडक दिली. यावेळी राज ठाकरेंच्या कारचा ताफा पुढे निघून गेला होता. दुसरी कार बोलावून शर्मिला ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेले सर्व मुंबईच्या दिशेने रवाना झाले.