पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सत्तेत समान वाटा, याचाच अर्थ मुख्यमंत्रिपदही विभागूनचः आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे (Pramod Thakur/HT)

सत्तेत समान वाटा म्हणजे मुख्यमंत्रिपदासह सर्व पदे विभागून घेणे, असाच होतो, असे स्पष्ट मत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. आदित्य हे सध्या संपूर्ण राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यात जनआशीर्वाद यात्रा सुरु केली आहे.  लोकांची इच्छा असेल तर विधानसभा निवडणुकीला उभे राहायचे की नाही हे या यात्रेच्या अखेरीस ठरवू असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या राज्याची धुरा सांभाळण्यास तयार असल्याचे सूचित केले आहे. आदित्य ठाकरे यांनी 'हिंदुस्थान टाइम्स'शी संवाद साधला, त्याचा सारांश पुढीलप्रमाणे..

शिवसेनेकडून आदित्य ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार

मुख्यमंत्रीपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी कोणत्याही मोठ्या पदाचे लक्ष्य ठेवलेले नाही. मला महाराष्ट्राचे विचार जाणून घ्यायचे आहेत. ज्यांनी आम्हाला मतदान केले त्यांचा मी आभारी आहे. ज्यांनी आम्हाला मतदान केलेले नाही त्यांची मनं जिंकणं हेच जन आशीर्वाद यात्रेचे ध्येय आहे. सध्या तीच माझी जबाबदारी आहे. शिवसेनेचे नेते मुख्यमंत्रिपदासाठी माझ्या नावाचा उल्लेख करत आहेत. मी तो त्यांचा आशीर्वाद समजतो. पण हे लोकांकडून यायला हवे. लोकांनी निवडणूक लढवण्यास सांगितल्यास मी नक्कीच लढवेल. त्यांची मी सेवा करेन.

अनुभव नसल्याची टीका आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्याने केली जाते. त्यावर ते म्हणाले की, मागील विधानसभा निवडणूक मी लढवू शकलो नाही. कारण त्यावेळी मी २४ वर्षांचा होतो. मला त्यावेळी एक वर्ष कमी पडला. मागील १० वर्षांत पक्षाच्या प्रत्येक घडामोडीत सहभाग नोंदवला. राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो. मग ते शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न किंवा महिला सुरक्षितता यासारख्या अनेक मुद्द्यांवर काम केले. आम्ही फक्त प्रश्न उपस्थितीत करत नाही तर निश्चित कालमर्यादेत त्याच्यावर उपायही शोधतो. 

आता राजकारण नव्हे मदत करण्याची गरजः आदित्य ठाकरे

राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत भाजप-सेना नेत्यांच्या वक्तव्यावर त्यांनी म्हटले की, दोन पक्षाध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाबाबत मी बोलणारत नाही. उद्धवजी, अमितजी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीच राज्यात सत्तेचे आणि जागांचे समान वाटप होणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे. या वाक्यातूनच हे स्पष्ट होते. दोन पक्षांच्या प्रमुखांच्या निर्णयावर भाष्य करण्यास मी खूप लहान आहे. 

भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्रिपद आणि जागा वाटपांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्याबाबतही त्यांनी आपले मत मांडले. दोन्ही पक्षाच्या केडरने आपल्या पक्ष नेतृत्वावर विश्वास दाखवायला हवा. पक्षप्रमुखांनी सत्तेत समान वाटा आणि निवडणुकीनंतर पदाच्या वाटपाबाबत ठरवलेले आहे. दोन्ही पक्षांची सत्तेत परत येण्याची इच्छा आहे. पण जेव्हा पक्ष प्रमुखांनी एखादी गोष्ट निश्चित केली असेल तर तो मुद्दा त्यांच्यावरच सोडून द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेत सध्या आदित्य ठाकरे ट्रेंडिंगमध्ये