पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'युतीला बहुमत असल्याने भाजप-सेनेनेच सत्ता स्थापन करावी'

शरद पवार (Ht photo by Anshuman poyrekar)

शिवसेना आणि भाजपने लवकरात लवकर सत्ता स्थापन करावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद यांनी सांगितले आहे. शरद पवारांनी मंगळवारी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुंबईमध्ये परतल्यानंतर शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, शिवसेना आणि भाजप मित्र पक्ष असून त्यांनी एकत्रित निवडणूक लढवली आहे. युतीला बहुमत असल्यामुळे त्यांनीच सरकार स्थापन करावे, असे पवारांनी सांगितले.

युतीवर गिरीश महाजन म्हणाले, आपण हिंदुस्थान-पाकिस्तान 

शरद पवारांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलताना शिवसेनेकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव आल्याशिवाय आम्ही पुढं कसं जाणार असा सवाल उपस्थित केला होता. मात्र या भेटीनंतर मुंबईत परतल्यानंतर भाजप-सेनेनेच सत्ता स्थापन करावी अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. 

तब्बल ११ तासांनंतर दिल्ली पोलिसांनी आंदोलन घेतले मागे

तसंच, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रच आहे. त्यामुळे शिवसेना- भाजपनेच सरकार स्थापन करावे ही त्यांची जबाबदारी असल्याचे पवार यांनी सांगितले. शरद पवार मुंबईत परतले असून बुधवारी दुपारी १२ वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

उद्धव ठाकरेंनी गोपीनाथ मुंडेंच्या समाधीस्थळाचं घेतलं दर्शन